Home » » फ्लिपकार्ट.कॉम एक ऑनलाईन दुकान

फ्लिपकार्ट.कॉम एक ऑनलाईन दुकान

Written By Admin on November 16, 2013 | 6:19:00 am

फ्लिपकार्ट:-  
           फ्लिपकार्टची सुरुवात ६ वर्षे पूर्वी आय.आय.टी दिल्ली येथे शिकणाऱ्या दोन हुशार विद्यार्थ्यांनी केली.फ्लिपकार्ट हे एक ऑनलाईन दुकान असून तुम्हाला हव्या असलेल्या गरजेच्या नेहमीच्या वापरातील वस्तू या दुकानात मिळतात.Alexa या नामांकित कंपनीच्या माहितीनुसार फ्लिपकार्ट हि भारतातील सर्वोत्तम २०  साईटपैकी एक आहे.फ्लिपकार्टमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, पिशव्या , स्वयंपाकाघरातील वस्तू, पुस्तके उपलब्ध आहेत.अलीकडेच फ्लिपकार्टने ऑफर झोन नावाचा विभाग सुरु केला आहे.ज्यामध्ये फ्लिपकार्ट वरील वस्तू आकर्षक किमतीत , सवलतीत दिल्या जातात.तसेच रोज एका वस्तूवर ४० ते ५० % सवलत असते. त्यांच्याकडे मोबाईलसाठी स्वतंत्र मोबाईल साईट असून , स्वतःचे मोबाईल सॉफ्टवेअर आहे.फ्लिपकार्टवर कूपन सवलत उपलब्ध नाही परंतु त्यांनी त्यांच्याशी स्पर्धा करणार्यांच्या तुलनेत कमी भाव व जास्त गुणवत्तेचा माल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यांचा ग्राहक सेवा विभाग हा अत्यंत तत्पर असून तुमची अडचण एका फोनमध्ये सोडविण्यात येते असा माझा अनुभव आहे.फ्लिपकार्टवर इ-वालेट नावाची सुविधा असून त्यामध्ये तुम्ही अगोदर तुमचे पैसे साठवू शकता आणि लवकरात लवकर इ-वालेट द्वारे पैसे वापरून तुम्ही वस्तू मागवू शकता.तसेच फ्लिपकार्ट तुमचे पैसे क्रेडीट /डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग द्वारे स्वीकारतो.असे असले तरी जास्तीत जास्त लोक कॅश ओन डिलिवरी म्हणजे आमची वस्तू मिळाल्यावर आली पैसे देऊ हा पर्याय निवडतात.


     फ्लिपकार्ट तुमची ऑर्डर स्वीकारल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे पर्यंत करतो.जवळजवळ ३ ते ५ दिवसात तुमची वसू तुमच्या दारात तुम्हाला मिळते.फ्लिपकार्ट आकर्षक बांधणी करून तुमची वस्तू पाठवतो , जेणे करून प्रवासादरम्यान वस्तूला हानी पोहोचणार नाही. जर तुम्हाला खराब वस्तू मिळाली तर ती वस्तू बदलून दिली जाते.जर तुमच्या सर्व वस्तूच्या किमतीची बेरीज ५०० पेक्षा जास्त असेल, तर ती वस्तू पाठविण्याचा खर्च फ्लिपकार्ट घेत नाही अथवा ५०/- शिपिंग चार्जेस घेतले जातात. 
फ्लिपकार्ट.कॉम हि साईट - by Team TechDigit

   तर कशाची वाट बघता माग...तुमचा पत्ता पिन कोड सह तयार ठेवा ...एकदा ह्या ऑनलाईन दुकानाला जरूर भेट द्या. जर काही शंका असतील तर कॉमेंट बेधडक करा.
फ्लिपकार्ट.कॉम ला भेट देण्यासाठी  Flipkart.com << येथे जावा

Follow us