फक्त २०० रुपयात वेबसाईट तयार करा.

१) जसं कि मी तुम्हाला वर सांगितले की तुमच्याकडे स्वतःचा डोमेन (म्हणजेच वेबसाईटचा पत्ता ) असणे जरुरी आहे.इंटरनेटवरील बऱ्याचशा वेबसाईट तुम्हाला मोफत सबडोमेन पुरवितात.सबडोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटच्या पत्त्यानंतर त्या त्यांचा पत्ता घालतात.जसे कि abc.website.com यात website.com हे सबडोमेन झाले.सबडोमेन वापरणे मोफत असले तरी तुमचा स्वतःचा डोमेन तुम्ही काही रुपयातच खरेदी करू शकता.स्वतःचा डोमेन abc.com अशा स्वरुपात असतो.सर्वात स्वस्त डोमेन प्रदात्यांमध्ये बिगरॉक ही भारतीय कंपनी अग्रेसर आहे.तुमचा डोमेन रजिस्टर करण्यासाठी खालील कृती करा.
1) बिगरॉकच्या>> Bigrock << या वेबसाईटवर जावा.
2) तुमचा डोमेन नेम निवडा.
3) जर तो उपलब्ध असेल तर त्याचे पैसे भरून तो ताब्यात घ्या.
4) उपलब्ध नसेल तर दुसरा निवडा.
2) आता तुमच्याकडे डोमेन आहे पण इंटरनेटवर जागा नाही.(म्हणजे घराचा पत्ता आहे पान घरासाठी अजून जागा घेतलेली नाही असे काहीसे).चला तर माग जागेचेही बुकिंग करून टाकू.जागा तुम्हाला विकतहि मिळते आणि फुकटही.सध्या तरी फुकटच वापरू.
1) पुढील >> 000webhost <<वेबसाईटवर जावा.3) आता तुमच्याकडे सर्व आवश्यक गोष्टी आहेत.(१.डोमेन २. होस्टिंग ३.ऑफलाईन वेबसाईट).आता 000webhost च्या खात्यात लॉग इन व्हा.त्यानंतर फाईल मॅनजर पर्याय निवडा.तेथे तुम्हाला public html हे फोल्डर दिसेल.त्यात तुमची वेबसाईट अपलोड करा.त्यानंतर index असे नाव होमपेज/मुख्य पानाला द्या.त्याशिवाय साईट व्यवस्थित उघडणार नाही.
2) तेथे तुमचा इमेल पत्ता वापरून एक मोफत खाते उघडा.
3) त्यानंतर तुमच्या डोमेन खात्यात (बिगरॉककडे) लॉगइन व्हा.
4) 000webhost जसे सांगतील तसे बदल डोमेनच्या नेमसर्वर मध्ये करा.
4) सर्वात शेवटी तुमचा वेब अॅडरेस ब्राऊझरवर टाका आणि एनटर करा.झाली तुमची वेबसाईट ऑनलाइन.चला मग तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुमच्या साईटला भेट द्यायला सांगा आणि आमच्या सुद्धा...