Pages

January 09, 2014

आला आहे इलेक्ट्रॉनिक टूथब्रश

Your ToothBrush is Electrified
जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक टूथब्रश
तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस नवनवीन बदल होत असतात.कोलीब्री या विदेशी कंपनीने सर्वाकडून नियमित वापरला जाणारा टूथब्रश आधुनिक करायचे काम केले आहे.
    ह्या नवीन टूथब्रशचे नाविन्य असे कि यात ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.ब्रश आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेले कंपनीने पुरविलेले एक  सॉफ्टवेअर ब्लूटूथ मार्फत जोडले जातील.त्यामुळे तुम्हाला मोबाईलवर तुमच्या दात स्वच्छतेची माहिती कळू शकेल.हा स्मार्ट टूथब्रश तुमच्या फोनशी आपोआप जोडला जातो. 
     हा ब्रश फक्त तुम्ही कसे दात घासता याचीच फक्त माहिती ठेवत नाही तर तुम्ही किती वेळ दात घासता यासारखी माहिती देखील तुम्हाला मोबाईलवर दिसू शकेल.हा नवीन उपयोगी टूथब्रश बाजारात या वर्षीच्या जून-जुलै महिन्यात दाखल होईल.याची किंमत कंपनीने जवळपास ९००० ठेवली आहे.ज्यात तुम्हाला एक इलेक्ट्रॉनिक टूथब्रश आणि एक मोबाईल सॉफ्टवेअर दिले जाईल.     

सदरील लेख पुढील भाषेत वाचता येईल