Home » » जगातील सर्वात लोकप्रिय आणि व्हायरस मुक्त संगणक प्रणाली - उबुंतू

जगातील सर्वात लोकप्रिय आणि व्हायरस मुक्त संगणक प्रणाली - उबुंतू

Written By Admin on November 18, 2013 | 1:55:00 am

   

     आज आपण टेक डिजीट मध्ये उबुंतू या जगातील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम बाबत माहिती  घेणार  आहोत.उबुंतू ही एकमेव व्हायरस मुक्त प्रणाली असून ती बनविण्यासाठी जगभरातील तंत्रज्ञाकडून बनविण्यात आली आहे.ही मुक्त प्रणाली (ओपन सोर्स) असल्यामुळे तुम्हाला ही सिस्टम वापरण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत.लिनक्स या प्रकारातील ही एक आवृत्ती आहे.कॅनोनिकल या प्रसिद्ध कंपनीने याला सहाय्य पुरविले आहे.त्यामुळे ही अतिशय सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम आहे.
      सर्वसाधारण उपयोगकर्त्यांसाठी , उबुंतूला उत्तम व सोपी वापरायची पद्धत लाभली आहे.ही ऑपरेटिंग सिस्टम वेगवान , सुरक्षित आणि भरपूर ओपन सोर्स सॉफ्टवेअरनी समृद्ध आहे.तसेच सॉफ्टवेअर  निर्मिती क्षेत्रात असणार्यांसाठी पुष्कळ साधने यात पुरविण्यात आली आहेत.उबुंतू हि ऑपरेटिंग सिस्टम सर्व जागतिक भाषेत उपलब्ध आहे.त्यात आपली हिंदी व मराठी देखील समाविष्ठ आहे.
       या सिस्टमचे सर्वात अनोखे वैशिष्ठ्य म्हणजे याची बूटिंग(संगणक चालू होण्याची प्रक्रिया).ही सिस्टम फक्त ३० सेकंद चालू होण्यासाठी घेते.तसेच इन्स्टॉल करतानाच सर्व हार्डवेअरचे ड्रायवर इन्स्टॉल होत असल्याने पुन्हा ड्रायवर इन्स्टॉल करण्याची गरज भासत नाही.संगणकीय अनुभव सर्व व्यक्तींना उपलब्ध करून देण्यासाठी (अपंगत्व,अंधत्व) उबुंतूमध्ये काही ऑप्शन मोफत उपलब्ध आहेत.

उबुंतू १३.०४ , विकीपेडिया  तर्फे फोटो

      आमच्यावर विश्वास ठेवा आणि उबुंतू एकदा इन्स्टॉल कराच.तुम्ही एकाच संगणकावर दोन ऑपरेटिंग सिस्टम ठेवू शकतात.विंडोज सारखी असणारी ही सिस्टम विंडोजपेक्षाही एक पाउल पुढे आहे.

      आता वाट कसली बघता मग् वापरून बघताय ना उबुंतू.उबुंतूचे लेटेस्ट वर्जन डाउनलोड करण्यासाठी पुढील साईटला भेट द्या...  ubuntu.com



 

Follow us