![]() |
कारण -जेव्हा आपण ही जाहिरात पाहतो तेव्हा जाहिरातदार कंपनी टाटा'ला त्या जाहिरातीचे पैसे देते.ते पैसे टाटा तुमच्या मोबाईलच्या खात्यात टाकते.ते पैसे वापरून तुम्ही मोफत कॉल करू शकता.डोकोमो ने दिलेल्या हे सॉफ्टवेअर इंटरनेट शिवाय चालू शकत नाही.त्यासाठी तुम्हाला वाय फाय किंवा डेटा जोडणी असणे आवश्यक आहे.डेटा वापरासाठी टाटा कोणताही खर्च आकारणार नाही.
हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या डोकोमो मोबाईलवरून FREE असा एस.एम.एस ५२३२३ या निशुल्क नंबर वर करावा लागेल.त्यानंतर तुम्हाला एक रिप्लाय एस.एम.एस येईल ज्यात सॉफ्टवेअर डाऊनलोडची लिंक असेल. सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
मुख्य म्हणजे ही ऑफर दोन्ही प्रकारच्या GSM आणि CDMA प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.कंपनीने तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत.एक तर तुम्ही मोफत कॉल करू शकता किंवा तुमचा नेहमीचा balance वापरून देखील कॉल करू शकता.दुसऱ्या पर्यायाला जाहिराती दिसणार नाहीत.तुमचे पैसे संपेपर्यंत तुम्ही मोफत कॉल करू शकता.
अधिक माहितीसाठी पुढील साईट पहा टाटाडोकोमो.कॉम/गेट